आणि मी सिगारेट सोडली.

व्यसन सुटणं किंवा सोडवणं किती कठीण असतं हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहीत आहेच. पण व्यसन सोडायचंच असा जर त्यात गुरफटलेल्या व्यक्तीचा, मनाचा निर्धार असेल तर ते सोडणं/सोडवणं शक्यही असतं....सुधीर काळेसाहेब त्यांचे स्वत:चे अनुभव सांगताहेत....ऐकूया त्यांच्याच आवाजात.

५ टिप्पण्या:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

सिगारेट पिणा-यांसोबत सिगारेट न पिणा-यांनाही धुराचा विनाकारण त्रास होतो व आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. सिगारेट आरोग्याला हानिकारक आहे हे माहित असूनही ब-याच व्यक्ती सिगारेटचा अट्टहास सोडत नाही. मात्र सिगरेट सोडणे अशक्य नाही हेच तुमच्या अनुभाववरून सिद्ध होते.

महेंद्र म्हणाले...

मी पण एकेकाळी सिगरेट ओढत असे. आणि माझ्याही बाबतीत जवळपास ( म्हणजे ९० टक्के ) असेच घडले होते. मी आता सिगरेट सोडून २० वर्ष झाली आहेत. पण सुरुवातीला जेंव्हा ओढत असे, तेंव्हा दिवसाला तिन ते चार पाकिटं व्हायची.

नरेंद्र गोळे म्हणाले...

काळे साहेब,

आपले खरेखुरे दैदिप्यमान अनुभव नोंदवून ठेवून, आणि आज त्याचे अभिवाचनही उपलब्ध करवून देऊन आपण व्यसनमुक्ती चाहणार्‍या अनेक लोकांच्या विचारांना प्रवाही केले आहे.

त्याखातर आपले हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक धन्यवाद.

डॉ.ऑर्निशेस प्रोग्राम फॉर रिव्हर्सिंग हार्ट डिसिज या पुस्तकात व्यसनमुक्ती या विषयावर लिहीलेल्या विचारांच्या, मी केलेल्या स्वैर अनुवादाचा दुवा खाली देत आहे. आशा आहे की व्यसनमुक्ती चाहणार्‍यांना तोही उपयुक्त ठरेल.

http://www.manogat.com/node/7595

mynac म्हणाले...

काळे साहेब,
आपला अनुभव ऐकून लगेच कितीजण तो अमलात आणतील ते सांगू नाही शकत पण विचार मात्र नक्कीच करतील,नव्हे त्यांचे त्या दिशेने पडलेले ते पहिले पाउल असणार आहे आणि हेच तुमच्या अभिवाचनाचे फलित असणार आहे.धन्यवाद.

रोहन... म्हणाले...

मी 'नववी'मध्ये असताना पहिली सिगारेट ओढली होती... :) पण नंतर कधीच ओढली नाही. वाटलेच नाही कधी परत ओढवेसे... :)