पुणे आणि मी !

दर सुट्टीप्रमाणे ह्या ही सुट्टीत पुण्याला गेलो. पण ह्यावेळेस आई-बाबांबरोबर नसून एकटाच भटकत होतो..त्यामुळे पुणं एका वेगळ्याच नजरेनं बघितलं. माझे आणि पुण्याचे बंध काय आहेत त्याची एक वेगळीच जाणीव निर्माण झाली!...सांगताहेत विद्याधर भिसे...त्यांचे पुण्याबद्दलचे अनुभव.

१५ टिप्पण्या:

नरेंद्र गोळे म्हणाले...

अभिवाचन सुरेख झालेले आहे. पुण्याचा जाज्वल्य अभिमानही त्यातून व्यवस्थित अभिव्यक्त होत आहे. छान!

सचिन उथळे-पाटील म्हणाले...

कैच्याकै झकास..............

विसु: बाबा, तुझा ब्लॉग लिहण्याचा धडाका पाहता तुला प्रतिक्रिया देण्यासाठी माझ्याकडचे शब्द संपलेत.
आता फक्त तुझ्यासाठी राखीव शब्द आहेत....
कैच्याकै, लय भारी, झकास.... ई.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

पुण्याचे अनुभव मस्त! मात्र शेवट तुटक वाटला. अभिवाचन करत रहा.

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

विभि, लेखन आणि वाचन मस्तच. फक्त शेवट अर्धवट वाटला.

tanvi म्हणाले...

विभि मस्तच येकदम....

पण कांचन आणि अपर्णा म्हणताहेत तशा शेवटी कंटाळलास की काय...

THEPROPHET म्हणाले...

गोळेकाका,
खूप खूप धन्यवाद!अगं मला जेव्हा काका म्हणाले तू ही हाच लेख दिला आहेस, तेव्हाच

THEPROPHET म्हणाले...

सचिन,
अरे मित्रा तुमच्यामुळेच तर मी इतका धडाक्याने लिहू शकतो!
खूप आभार रे!

THEPROPHET म्हणाले...

कांचनताई,
शेवटी तो विनोद होता ना. तो कदाचित मी नीट पोचवू शकलो नसेन. किंवा तन्वीताई म्हणते तसा शेवटी शेवटी धीर सुटला असेल माझा...घाईघाईत शेवटून दुसर्‍या दिवशी रात्री करून पाठवलंय..तसंच झालं असेल! :)

THEPROPHET म्हणाले...

अलताई,
कांचनताईला म्हटलं तीच कारणं असावीत..विनोद नीट पोचला नाही बहुतेक!

THEPROPHET म्हणाले...

तन्वीताई,
शेवटाकडे घाई, कंटाळा ह्या सगळ्यांचा विजय झाला असावा! मला स्वतःला कळायचं नाही.. ;)

mynac म्हणाले...

प्रिय विद्या,
तुझे पुण्याचे निरीक्षण नक्कीच चांगले आहे पण माझ्या सारख्या जुन्या सदाशिव आणि नवीन शुक्रवारपेठी पुणेकराला मात्र जरा जास्त प्रेमाचच वाटल.स्वाभाविक आहे तू काठावर आहेस नि मी पाण्यात.त्या मुळे खोलीचा अंदाज मी जो सांगणार तोच ग्राह्य धरावा लागणार.अरे आता आम्हा मूळ पुणेकरांची सर्वात मोठी खंत हि आहे कि पेठा सोडल्या तर पुण हे मुळात पुण राहिलंच नाही रे.पोटार्थी म्हणून येऊन जेमतेम १०-१५ वर्षं पुण्यात येऊन राहिलेलेच आता पुणेकर म्हणून मिरवायला लागले आहेत.त्यांना ना पुण्या बद्दल आपुलकी ना प्रेम.तुळशीबाग म्हणून हे गणपती चौकाच्या हि मागे रिक्षाने उतरतात,नि शनिपाराला चितळ्यांचा नि उम्ब्र्या गणपती चौकाला शगुन चौक म्हणतात.अर्थात त्यांची तरी काय चूक आहे?जेव्हा नगरकर तालीम बायकांच्या नाईट गाऊनच्या मागे झाकली गेली नि आपली ओळखच विसरली तेव्हा बाकी सार तर किस झाड कि पत्ती!असो वाहिलं ते पाणी नि बाकी ते गंगा जल दुसर काय!

mynac म्हणाले...

खरा पुणेकर कसा तर आमच्या जोशीन सारखा.गेले बिचारे. झाल काय
एकदा जोशी त्यांच्या लहान मुलाला पतंग उडवायला म्हणून गच्चीवर घेऊन गेले.खर तर मुलगा हे निमित्त होते कारण त्यांच्या लहानपणी,तरुणपणी त्यांची हि हौस राहूनच गेली होती.खरतर पतंग बितंग म्हणजे पूर्वी रम्या जाधव,आश्या वांजळे,दत्त्त्या शिंदे वगैरेंचीच मोनोपोली असलेले क्षेत्र.जोशी ,लिमये,दामले,कुलकर्णी,गोडसे,गणपुले वगैरे मंडळी मवाल्यांचा खेळ म्हणून त्या पासून चार हात जरा लांबच असायचे.पण मुला मुळे आज जोशींना संधी मिळाली नि त्यांनी ती साधली.बघता बघता संध्याकाळ झाली पण जोशींना कळलेच नाही.एक तर त्यांना सुध्धा ते खेळणे नवीनच त्यामुळे पतंग उडवता-उडवता,कटवता-कटवता ते मागे-मागे कधी गेले नि गच्चीवरून कसे खाली पडले ते त्यांना सुध्धा कळले नाही.पण खाली पडता पडता त्यांच्या किचनच्या खिडकीच्या जवळ येताच त्यांनी बायकोला ओरडून सांगितल कि माझा संध्याकाळचा भात लावू नकोस,वाया जाईल नाही तर उद्या फोडणीचा करून खावा लागेल.
आम्ही मात्र आमचा एक सच्चा पुणेकर मित्र गमावून बसलो ते बसलोच.असो.

THEPROPHET म्हणाले...

mynac,
दादा..
>>तुळशीबाग म्हणून हे गणपती चौकाच्या हि मागे रिक्षाने उतरतात,नि शनिपाराला चितळ्यांचा नि उम्ब्र्या गणपती चौकाला शगुन चौक म्हणतात.अर्थात त्यांची तरी काय चूक आहे?जेव्हा नगरकर तालीम बायकांच्या नाईट गाऊनच्या मागे झाकली गेली नि आपली ओळखच विसरली तेव्हा बाकी सार तर किस झाड कि पत्ती!
हा पूर्ण परिच्छेद प्रचंड भारी.
आणि खरंय...तुझं ऑब्झर्व्हेशन जास्त व्हॅलिड आहे! :)
बाकी, जोशींना आणि त्यांच्यातल्या अस्सल पुणेकराला आपला सलाम! :P

mynac म्हणाले...

झटपट प्रतिक्रिये बद्दल आभारी आहे.मनःपूर्वक धन्यवाद

रोहन... म्हणाले...

बाबा... मला तुझ्या ह्या अभिवाचनाचा 'जाज्वल्य' अभिमान आहे रे!!!