मोनालिसाला कुठे होत्या भुवया?

एखादी सामान्य अशी व्यक्ती दिसायला यथातथा आणि  शारिरीक/मानसिक काही वैगुण्य असलेली असेल तर, आपण तिच्याशी कसे वागतो? पण तशाच तर्‍हेचे वैगुण्य असणारी  पण काही कारणाने खूपच सुप्रसिद्ध असलेली व्यक्ती.....तिच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन ह्यात किती जमीन-अस्मानाचा फरक असतो हे दाखवणारी ही कथा.
लेखन आणि अभिवाचन कांचन कराई ह्यांनी केलंय.


९ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

कांचनजी,तुम्ही खूप सुंदर लिहिता आणि तितक्याच सुंदरतेने वाचताही. तुम्ही खरं तर टीव्ही सिरियल मधे काम करायला हवं. आवाजाचा इतका सुंदर वापर पूर्वी म्हणे कुणी नीलमताई करायच्या असे मझी आई म्हणाली. तिलाही तुमचं वाचन खूप आवडलं.

भैरवी

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

अगदी प्रोफेशनल!

Meenal Gadre. म्हणाले...

मस्त लेखन आणि वाचन ही.
मेसेज तर आहेच यात !

महेंद्र म्हणाले...

कांचनचा आवाज् तर सुरेख आहेच पण लेख ही खूप मनःस्पर्शी आहे. ब्लॉग वरचं वाचन आणि इथलं ऐकणं यात खूप फरक पडतो... म्हणजे चांगल्या अर्थाने, इथे ऐकायला मस्त वाटलं डाउन लोड करून घेतलाय.

नरेंद्र गोळे म्हणाले...

कांचन,

अतिशय हृद्य आणि स्फुर्तीदायक किस्सा. लेखन आणि पेशकश, दोन्हीही. अभिवाचन आवडले.

इथे मला केशवसुतांची ’दुर्मुखलेला’ ही एक कविताच आठवते आहे.

[वर्गात एका शिक्षकाने मला ’दुर्मुखलेला’ म्हटले, त्यावरून माझ्या मनात आले ..]

दुर्मुखलेला
-केशवसुत


माझे शुष्क खरेच हे मुख गुरो!
आहे, तया पाहुनी
जाती प्रेक्षक सर्वही विरस ते,
चित्तामधे होऊनी

हे सर्वा उघडे असूनि, वदुनी
का ते तुम्ही दाविले?
तेणे भूषण कोणते मग तुम्हा
संप्राप्त ते जाहले?

"याचे तोंड कुरूप हे विधिवशात
गाईल काव्ये नवी
तेणे सर्वही डोलतील जन हे
हर्षे कदाचित भुवि!"

विद्यासंस्कृत त्या तुझ्या क्षणभरी
मस्तिष्कतंतूंवरी
येता नम्र विचार हा, तुज भला
होता किती तो तरी!

जे मुंग्या म्हणुनी मनी समजशी
या मंडळी भीतरी,
ते पक्षी उडतील होउनि गुरो!
व्योमी, न जाणो वरी,

राखेची ढिपळे म्हणोनि दिसती
जी, ती उद्या या जगा
भस्मीसात्‌ करणार नाहित अशी
तुम्ही हमी द्याल का

माझ्या दुर्मुखल्या मुखा
मधुनि या चालावयाचा पुढे
आहे सुंदर तो सदा
सरसवाक्निष्यंद चोहीकडे!

तुम्ही नाहि तरी सुतादि तुमचे
धातील तो प्राशुनी!
कोणीही पुसणार नाहि,
’कवि तो होता कसा आननी?’

१८८६, करमणूक, ३-१-९१

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

अभिवाचन छान. मागच्या बांकावरील मुलींचा आवाज मस्तच.

न्यूनगंड नसावाच. तरी एखाद्यानें वा एखादीनें प्रसाधनांचा (योग्य तेवढा, भडक नव्हे) वापर करून आपलें व्यक्तिमत्व जास्त उठावदार करायलाच पहिजे. माझ्या केसांचा रंग उडाला कीं कार्यालयांतील समस्त स्त्रीवर्ग मला तंबी देत असे, उद्यां केस काळे केले नाहींत तर दंड पडेल म्हणून. कैक वेळां मीं दंड भरलाहि आहे. दंड असे कांहीं तरी खादाडी. माझ्यासारख्या सरकारी संपर्क व्यावसायिकांच्या (Govt. Liasoning) बाबतींत तें योग्यच आहे असें आप्तस्वकीयांचें म्हणणें आहे. मला तसा अनुभवहि गेल्या ३५ वर्षांत आला. काळे केस, कंठलंगोट वगैरे कडक वेषभूषा केली कीं कठीण कामेंहि सहजगत्या होत.

सुधीर कांदळकर

Gangadhar Mute म्हणाले...

लेखन आणि वाचन दोन्ही अप्रतिम.

क्रांति म्हणाले...

कांचन, तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच! खूप आवडली कथा आणि अभिवाचन दोन्ही.

रोहन... म्हणाले...

हे ऐकताना नाटकाची सुरवात होत आहे असे वाटतंय... :)

अजून पडदा पडलाय आणि नाटक सुरु व्हायचं असं वाचन झाले आहे... मस्तच.. :)