सैनिकहो, तुमच्यासाठी !

आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सतत सीमेवर पहारा देत असलेले सैनिक कोणत्या नैसर्गिक आपत्तीत आणि विपरीत हवामान असलेल्या परिस्थितीत राहतात आणि तरीही त्यांचे मनोधैर्य किती उच्चकोटीचे आहे... ते सगळं तिथे जाऊन प्रत्यक्ष अनुभवल्यावर रोहन चौधरी काय म्हणतात ते पाहा. त्यांच्या लेखाचं अभिवाचन केलंय कांचन कराई ह्यांनी.

मावशी ते मेड !

कामवाली बाई....परदेशात ह्यांना मेड म्हणतात. अशा काही मेडचा...आपलं मेडींचा...अनेकवचन कसं आहे? :D
रुबाब कसा असतो....वगैरे म्हणता म्हणता गाडी येते आपल्याच देशातल्या कामवाल्या मावशींपर्यंत... ऐकूया हे मेड पुराण...

लेखिका: तन्वी देवडे
अभिवाचक: विद्याधर भिसे

अपहरण!

लहान मुलाचे उल्फा अतिरेक्यांकडून अपहरण आणि त्यामागची सत्य घटना सांगत आहेत....

लेखिका आणि अभिवाचक: अपर्णा लळिंगकर

सूर्य संपावर गेला तर!

काय म्हणता? शाळेत गेल्यासारखं वाटतंय?
का बुवा? असं का म्हणताय?
आम्हाला ना, शाळेत असे विषय निबंधाला यायचे.
हो का! छान!पण बरंका, हा देखिल निबंधच आहे. काय लिहिलंय ह्या निबंधात अशी उत्सुकता लागून राहीलेय ना? मग बसा पाहू सगळे आपापल्या जागेवर. बसलात? आता ऐका शांतचित्ताने.....

लेखक आणि अभिवाचक : नरेंद्र गोळे


भारताला गरज भरताची !

पूर्वापार आपल्याकडे चालत आलेली वंशपरंपरागत पद्धती म्हणजे घराणेशाही...म्हणजे बापानंतर मुलाने राज्य सांभाळणे. आजच्या युगातल्या राजकारणातही आपण हेच पाहतो आहोत...त्यामुळे राज्यव्यवस्था,शासनव्यवस्था डळमळीत झालेली दिसते. अशावेळी त्यावर योजावयाच्या उपायांबाबत ह्या लेखात काही उहापोह केलेला आहे. चला तर ऐकूया.

लेखक: चेतन गुगळे
अभिवाचक: प्रमोद देव

पुणे आणि मी !

दर सुट्टीप्रमाणे ह्या ही सुट्टीत पुण्याला गेलो. पण ह्यावेळेस आई-बाबांबरोबर नसून एकटाच भटकत होतो..त्यामुळे पुणं एका वेगळ्याच नजरेनं बघितलं. माझे आणि पुण्याचे बंध काय आहेत त्याची एक वेगळीच जाणीव निर्माण झाली!...सांगताहेत विद्याधर भिसे...त्यांचे पुण्याबद्दलचे अनुभव.

आणि मी सिगारेट सोडली.

व्यसन सुटणं किंवा सोडवणं किती कठीण असतं हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहीत आहेच. पण व्यसन सोडायचंच असा जर त्यात गुरफटलेल्या व्यक्तीचा, मनाचा निर्धार असेल तर ते सोडणं/सोडवणं शक्यही असतं....सुधीर काळेसाहेब त्यांचे स्वत:चे अनुभव सांगताहेत....ऐकूया त्यांच्याच आवाजात.

गुलाबी संध्याकाळ!

आपल्या आयुष्यात एकतरी गुलाबी संध्याकाळ यावी असं प्रत्येक प्रेमवेड्या व्यक्तीला वाटत असतं...त्याबद्दल कवीला काय म्हणायचंय ते ऐकूया.

कवी: अमोघ वाघ
अभिवाचक:दिनेश कोयंडे
(आपले बझवरचे मित्र आनंद काळे ह्यांनी कवी आणि अभिवाचक ह्यांच्या संमतीने हे ध्वनीमुद्रित ह्या अंकासाठी पाठवलंय ह्याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.)

ओठातले,मनातले !

पुरुषांना...तेही लग्न झालेल्या पुरुषांना आपल्या बायकोची भाषा कधीच कळत नाही....असं म्हणतात की बायका जे बोलतात त्याच्या नेमका उलटा अर्थ त्यांना अभिप्रेत असतो. बहुतेकवेळा हो चा अर्थ नाही आणि नाही चा अर्थ हो असतो...आणि त्यामुळे नेहमीच घोळ होतात....

लेखक: महेंद्र कुलकर्णी

ह्या लेखाचे अभिवाचन आम्ही मुद्दामच दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून स्वतंत्रपणे करून घेतलंय.. एक स्त्री आणि पुरुष अशी योजना केलेय. ऐका आणि मजा लुटा अभिवाचनातून

अभिवाचक: कांचन कराई





अभिवाचक: विद्याधर भिसे

१५ ऑगस्ट, १९५८ !

लहान पणी रडकी असलेली मुलं मोठेपणी म्हणे संपादक होतात. ते ही ध्वनीमुद्रित अंकाचे संपादक! ;)
अश्याच एका रड्या संपादकाची एक गंमत ऐकूया मीनल गद्रे ह्यांच्या आवाजात.


त्याच्या पाईकांचे मेंदू !

धर्म आणि धार्मिकता, त्यातले अवडंबर,नियम वगैरे गोष्टींबद्दल कुणी बोलायला लागलं की एक तर तो अतिशय धार्मिक माणूस आहे किंवा त्या उलट तो एक पूर्णपणे नास्तिक माणूस आहे असे आपण म्हणू शकतो...कारण हीच
लोकं धर्माबद्दल अहम-अहमिकेने बोलत असतात. बाकी तुम्ही आम्ही मंडळी रोजच्या जगण्यात धर्म वगैरेचा विचारही करत नाही.धर्माबद्दलचे असेच एका सामान्य माणसाचे विचार आपल्या अभिवाचनातून मांडताहेत हेरंब ओक.


उशी !

उशी. झोपताना डोक्याखाली आपण घेतो ती उशी.
तुम्ही म्हणाल... तिचं विशेष ते काय?
विशेष काय?... तुम्ही स्वत:च ऐका अनुजा पडसलगीकर काय म्हणताहेत ते.


पाऊस माझा सखा !

पाऊस! पाऊस म्हटलं की तुम्हा आम्हाला छत्री-रेनकोटची आठवण होते....साहजिकच आहे हो ते....कारण आपण आहोत सामान्य माणसं...पण ...पण काही लोक खास असतात...त्यांना तो चक्क त्यांचा मित्र,सखा वाटतो.कसा?
कसा ते सांगताहेत विशाल कुलकर्णी .

ओढ !

ऋतूमानातील बदल हा तर निसर्गाचा नियम आहे.
हा बदल हसत मुखाने स्वीकारायला ही वसुधा म्हणजेच पृथ्वी सदैव तयार असते.
वसंत ऋतूला तर पृथ्वीने सखाच मानले आहे. त्याच्या भेटीसाठी ती आतुरली आहे. तिची ही ‘ओढ‘ काव्यातून व्यक्त केली आहे कवी विशाल कुलकर्णी ह्यांनी  आणि कवितेचं अभिवाचन केलंय मीनल गद्रे ह्यांनी.

गोष्ट साधीच आहे.

गोष्ट साधीच आहे...असे म्हणत म्हणत  आपल्याला आपल्या रोजच्या जीवनातील विसंगती किती खुबीने
दाखवलेय ते पाहा....लेखक आणि अभिवाचक आहेत विनायक रानडे

प्रतिबिंब !

आरशात, पाण्यात आपण पाहतो ते आपलं प्रतिबिंब....तसंच आपलं प्रतिबिंब आपल्या आजूबाजूला असललेल्या लोकांच्या मनातही दिसून येत असतं. एकाच व्यक्तीची अनेक प्रतिबिंब अशा तर्‍हेने आपल्याला दिसत असतात....मग नेमकं खरं कोणतं...असा प्रश्न साहजिकच पडतो...हे झालं वैयक्तिक; पण आपल्या देशाबद्दल जगातल्या इतर लोकांना काय वाटतं...म्हणजेच त्यांच्या मनातलं आपल्या देशाचं प्रतिबिंब  काय आहे? जाणून घ्यायचंय? तर मग ऐका सोमेश बारटक्के ह्यांचे अनुभव त्यांच्याच आवाजात!

मोनालिसाला कुठे होत्या भुवया?

एखादी सामान्य अशी व्यक्ती दिसायला यथातथा आणि  शारिरीक/मानसिक काही वैगुण्य असलेली असेल तर, आपण तिच्याशी कसे वागतो? पण तशाच तर्‍हेचे वैगुण्य असणारी  पण काही कारणाने खूपच सुप्रसिद्ध असलेली व्यक्ती.....तिच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन ह्यात किती जमीन-अस्मानाचा फरक असतो हे दाखवणारी ही कथा.
लेखन आणि अभिवाचन कांचन कराई ह्यांनी केलंय.


बिपाशाले लुगडं !

गंगाधर मुटे, एक मोकळा ढाकळा कवीमनाचा माणूस आणि बिपाशा!
हं हं हं, ती, तीच ती बिपाशा बसू हो...आपली! आपली म्हणजे सिनेमातली हो! आता तुम्ही म्हणाल ह्या मुटेसाहेबांचा आणि तिचा काय संबंध?

संबंध! आहे ना!
कसा?
सांगतो.

तिला लुगडं नेसवलं तर? अशी एक भन्नाट कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि ते लगेच लागले की हो कामाला.
ऐकायचंय, कसं ते?
मग ऐका त्यांच्या शब्दात आणि त्यांच्याच आवाजात.


अब्राहम लिंकन ह्यांचे हेड मास्तरांना पत्र

आपल्या पाल्याला शाळेत मास्तरांनी कसे आणि काय शिकवावे?   काही अपेक्षा असतात तुमच्या आमच्या...पालकांच्या. अमेरिकेचे माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन, इथे एक पालक ह्या नात्याने त्यांच्या मुलाला शाळेत कशा प्रकारचे शिक्षण मिळणे अपेक्षित आहे ते पत्राद्वारे लिहित आहेत शाळेच्या हेड मास्तरांना....काय म्हणताहेत ते...ऐकूया चला.


मूळ लेखन: अब्राहम लिंकन
मराठी भाषांतर: कविवर्य कै. वसंत बापट
अभिवाचन: श्रेया रत्नपारखी

सभ्यतेची अभिरुची !

आधुनिकतेच्या नावाखाली सगळ्याच व्याख्या कशा बदलत चाललेत...त्यातही जिथे तिथे आढळणारे स्त्रीदेहाचे खुल्लमखुल्ला प्रदर्शन... हे आपल्या कवितेतून मार्मिकपणे आणि ग्रामीण ढंगात मांडताहेत कवी  गंगाधर मुटे; कवितेचे अभिवाचनही ते स्वत:च करत आहेत.

कृष्णपिसे

अनुजा मुळे उर्फ झुंबर ह्यांची ही सुंदर कविता ऐका. अभिवाचक आहेत मीनल गद्रे.