बिपाशाले लुगडं !

गंगाधर मुटे, एक मोकळा ढाकळा कवीमनाचा माणूस आणि बिपाशा!
हं हं हं, ती, तीच ती बिपाशा बसू हो...आपली! आपली म्हणजे सिनेमातली हो! आता तुम्ही म्हणाल ह्या मुटेसाहेबांचा आणि तिचा काय संबंध?

संबंध! आहे ना!
कसा?
सांगतो.

तिला लुगडं नेसवलं तर? अशी एक भन्नाट कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि ते लगेच लागले की हो कामाला.
ऐकायचंय, कसं ते?
मग ऐका त्यांच्या शब्दात आणि त्यांच्याच आवाजात.


७ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

मुटेसाब, क्या बात है! अरे तुम्ही कमालच केलेय ह्यात. एकदम बिपाशा?
नही साब, कुछ भी बोलो.तुमच्या लेखणीत दम आहे आनि अभिवाचनात पन.

शारुख

Mahendra म्हणाले...

तुम्ही नागपूरला नेऊन पोहोचवलं एकदम.. तुमचा ब्लॉग तर प्रत्येक पोस्ट वाचत असतो, पण तुमची म्हणण्याची ढब ऐकली आणि एकदम लहानपण आठवलं. धन्यवाद.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis म्हणाले...

मुटेबाबा तुमी तर लई कहरच क्येला. काय म्हनाव तुमाले!

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

मस्त गावरान मातीचा वास. पण ध्वनिमुद्रण सुधारणें जरूरीचें आहे.

सुधीर कांदळकर

Gangadhar Mute म्हणाले...

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. त्यामुळे विश्वास दुणावला.
हे माझे पहिलेच काव्यवाचन. आणि हेडफ़ोनच्या माईकवरून केलेले ध्वनिमुद्रण.
त्यामुळे सुधिरजी आपण म्हणता ते खरे आहे.

रोहन... म्हणाले...

मुटे साहेब... तुमच्या कविता नेहमीच वाचतो.. आज ऐकायला मिळाली.. :) जबरी... :)

mynac म्हणाले...

मुटे साहेब,
कविता एकदम मस्तच आहे हो.ऐकताना खूप मजा आली नि मनात एकदम येऊन गेल कि खरोखरच्या बिपाशान जर हि ऐकली तर??? काय मजा येईल नाही?