ओठातले,मनातले !

पुरुषांना...तेही लग्न झालेल्या पुरुषांना आपल्या बायकोची भाषा कधीच कळत नाही....असं म्हणतात की बायका जे बोलतात त्याच्या नेमका उलटा अर्थ त्यांना अभिप्रेत असतो. बहुतेकवेळा हो चा अर्थ नाही आणि नाही चा अर्थ हो असतो...आणि त्यामुळे नेहमीच घोळ होतात....

लेखक: महेंद्र कुलकर्णी

ह्या लेखाचे अभिवाचन आम्ही मुद्दामच दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून स्वतंत्रपणे करून घेतलंय.. एक स्त्री आणि पुरुष अशी योजना केलेय. ऐका आणि मजा लुटा अभिवाचनातून

अभिवाचक: कांचन कराई





अभिवाचक: विद्याधर भिसे

७ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

खरे तर प्रत्येकाला एक एक प्रतिक्रिया द्यायला हवी..पण सध्या येथेच देतो..कांचन कराईचा आवाज खूपच छान आहे. व बोलण्यातील बारकावेपण त्यांना उत्कृष्ट टिपता येतात.खूप छान वाटले ऐकताना. विद्याधर भिसेचा आवाजही चांगला आहे...पण चढ उतार थोडे कमी वाटले कदाचित लगेचच्या लगेच दोन ओदिओ ऐकल्याने पुरुषावर अन्याय होत असेल माझ्याकडून...माहित नाही...प्रमोदजी तुम्ही खूप मोठे काम करताय..कदाचीत तुम्हाला याची कल्पना नसेल पण येणाऱ्या पिढ्या तुम्हाला लाख लाख धनयवाद देतील.
असो..
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

विद्याधर, जर तू याआधी तू कधी जर अभिवाचन केलेलं नसशील तर हे अभिवाचन तू खूप चांगलं केलं आहेस. आवाजातील चढ उतार थोडे कमी आहेत पण चढ उतार म्हणजे काय हे तुला माहित आहे आणि पुढे कधी जर अभिवाचन केलंस तर त्यात तू आणखी मोकळं होऊन आवाज द्यावास असं मी सांगेन. स्त्रीच्या पहिल्या वाक्यात ("नको, मी खिचडी लावते.") आणि शेवट्च्या प्रसंगात ("अहो, अहो मला कुणाचा तरी आवाज...) तू जी काही मजा केली आहेस ना... भन्नाट! दुसरा शब्द नाही. तुझा आवाज अभिवाचनासाठी अत्यंत योग्य आहे. तुला जर आवड असेल तर अभिवाचन करत रहा आणि कुणालाही ऐकवण्या आधी स्वत: ऐक. तुला आपोआपच चूक बरोबर समजत जाईल. हे अभिवाचन करताना मी सुद्धा काही चुका केल्या आहेत. पण माझ्याकडे वेळ कमी होता, त्यामुळे मी फार एडीटींग करू शकले नाही. तुझ्या अभिवाचनात तू पार्श्वसंगीत न वापरल्याने आवाज एकदम व्यवस्थित पोहोचतो आहे. मला तुझं अभिवाचन आवडलं.

THEPROPHET म्हणाले...

कांचनताई,
हौसला अफज़ाईसाठी खूप खूप आभार गं!
अगं तुझं एकदमच प्रोफेशनल अभिवाचन आहे. एकदम छान. तुझ्या वाचनात ठहराव आहे, त्यामुळे ऐकायला मस्त वाटतं.
मी हौशी नमुना आहे! ;) मी ह्यापूर्वी शब्दबंधच्या वेळी केलं होतं अभिवाचन. बाकी, चढ उताराचं म्हणशील तर मी केला होता प्रयत्न. पण कदाचित मी अविवाहित असल्याने, विवाहित माणसाचे अनुभव वाचताना थोडासा बावचळून गेलो... ;)
तू सांगतेस तसं पुढच्या वेळेस नक्की अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करेन.

Anuja म्हणाले...

कांचन तर अभिवाचनात तरबेज आहेच पण मला विद्याधर तुझे हि वाचन आवडले. मी पण अभिवाचन प्रकारात नवखी आहे. मी काय अजून सांगणार??? मला आवडले.

Mahendra म्हणाले...

दोघांचंही अतिशय उत्कृष्ट झालंय अभिवाचन. धन्यवाद.

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

कांचन कराईंचा ’मातकट’ हा आणि 'छान आहे हं तुमची आवड’ झकास. पार्श्वसंगीत मस्त.

सुधीर कांदळकर

रोहन... म्हणाले...

दादा.. तुझ्या अनुभवाचा मला खूपच उपयोग होतो रे. :) थांकू.. थांकू.. :D

कांचनचा तर मी मोठा पंखा आहे.

गरगर.. फिरणारा ४ पात्यांचा... :D